
वडोदरा : वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यस सुरू केले. त्यांनी आतपर्यंत ९ जणांचे मृतदेह बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा फक्त २ जणांचा मृत्यू झाला. पण आता मृतांचा आकडा वाढून ९ वर पोहचला आहे. ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पूल कोसळल्याने वडोदरा आणि आणंदमधील संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. हा पूल कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आता प्रवाशांना वडोदरा ते आणंद किंवा आणंद ते वडोदरा प्रवास करण्यासाठी ४० किलोमीटरचा लांब वळसा घ्यावा लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta