
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
पिथोरागड : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उत्तराखंडमधील पिथोरागड येथे भाविकांना घेऊन जाणारी जीप १५० फूट खोल दरीत कोसळली. मुवानी शहरातून बोक्ताकडे ही जीप जात होती. ही जीप पुलावरून थेट दरीत कोसळून नदीमध्ये पडली. या अपघातामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या पिथोरागडमधील जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५२ किमी अंतरावर जीपला अपघात झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जीपमधून १३ जण प्रवास करत होते. जीप पुलावरून दरीत कोसळत नदीत पडली. यावेळी जीपमध्ये असलेल्या प्रवाशांनी जोरात आरडाओरडा केला. या अपघातामध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामध्ये ३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
जखमींना नदीतून बाहेर काढून रस्त्यावर आणण्यात आले आणि नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. सर्व मृत बोक्ता येथील असल्याचे सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta