Monday , April 20 2026
Breaking News

आमदारांच्या तक्रारींची दखल घेण्याचे सुरजेवालांचे मंत्र्यांना आवाहन

Spread the love

 

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/

——————————————————————

—————————————————————–

दुसऱ्या दिवशीही जाणून घेतला मंत्र्यांच्या कामाचा अहवाल

बंगळूर : कालपासून राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारे प्रदेश काँग्रेस प्रभारी आणि एआयसीसी सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज दुसऱ्या दिवशी मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आणि त्यांना आमदारांच्या तक्रारींची दखल घेऊन कामे करण्याचे आवाहन केले.
गेल्या दोन आठवड्यांपासून दर आठवड्याला तीन दिवस राज्यात येणारे आणि आमदारांच्या समस्या ऐकणारे सुरजेवाला कालपासून मंत्र्यांचे म्हणणे ऐकत आहेत आणि त्यांच्या विभागांच्या कामगिरीचा आढावाही घेत आहेत. आज दुपारी मंत्री सतीश जारकीहोळी, एस. एस. मल्लिकार्जुन, बोसराजू, मधु बंगरप्पा आणि पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्रस्वामी यांनी त्यांची भेट घेतली. दुपारनंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. एच. सी. महादेवप्पा, आर. बी. तिम्मापुर आणि इतर कांही मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी या सर्व मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या आणि त्यांना आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य देण्यास सांगितले.
आमदारांची कामे झाली पाहिजेत. मंत्री प्रतिसाद देत नसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. आमदारांनी अशा तक्रारी रोखण्यासाठी त्यांच्या तक्रारी ऐकूण घ्याव्यात आणि त्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यावा, असे निर्देश त्यांनी मंत्र्यांना दिले.
काल बंगळुरमध्ये पोहोचलेल्या सुरजेवाला यांनी मंत्री जमीर अहमद खान, भैरती सुरेश आणि रहीम खान यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या. आज काही मंत्र्यांसोबत बैठक घेणारे सुरजेवाला उद्याही मंत्र्यांशी सल्लामसलत सुरू ठेवतील. उद्या मंत्र्यांसोबत बैठक घेतल्यानंतर, सुरजेवाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशीही बैठक घेतील आणि आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत घेतलेला आढावा त्यांच्यासमोर मांडतील.
आमदारांच्या असंतोषाला शांत करण्यासाठी हायकमांडच्या आदेशानुसार ते आमदार, मंत्र्यांच्या बैठका घेत आहेत. आमदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या मंत्र्यांसमोर मांडत आहेत. सुरजेवाला शेवटी हायकमांडला आपला अहवाल सादर करतील.
नोव्हेंबरनंतर होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी या बैठकांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जात असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *