
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज (रविवारी दि. 20 जुलै) एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सामूहिक आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अहमदाबाद ग्रामीण एसपींनी या घटनेबाबाच माहिती देताना सांगितले की, बावळा येथील भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. हे सर्वजण मूळचे ढोलका येथील रहिवासी होते. मृतांमध्ये विपुल कांजी वाघेला (34), त्यांची पत्नी सोनल (26), त्यांच्या दोन मुली ( एक 11 वर्षांची आणि दुसरी 05 वर्षांची) आणि एक मुलगा (08 वर्षांचा) यांचा समावेश आहे.
पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घराची झाडाझडती घेत आहेत आणि या घटनेबाबतचे पुरावे गोळा करत आहेत. यासोबतच ते जवळपास राहणाऱ्या लोकांचीही चौकशी करत आहेत. हे कुटुंब मूळ कुठून राहत होते हे देखील शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta