Sunday , July 26 2026
Breaking News

युवा समिती सिमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची उद्या घेणार भेट..

Spread the love

 

बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नडसक्तीचा फतवा निघाला. त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नडसक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने रविवार दिनांक 20 रोजी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सतीश जारकीहोळी यांची भेट घेण्यासाठी दुपारी ठीक 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथून गोकाकला निघायचं आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन युवा समिती सिमाभागच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *