नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकर्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. 30 वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे.
या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे. गेले तीस वर्षे राजीव गांधींचा मारेकरी पेरारिवलन कारागृहात शिक्षा भोगत होता. आता तीस वर्षांनंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज या प्रकरणातला शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी आत्मघातकी बॉम्बने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रविचंद्रन या सात जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …