Monday , September 21 2026
Breaking News

राजीव गांधींच्या मारेकर्‍याची सुटका होणार; सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण

Spread the love

नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकर्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. 30 वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे.
या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे. गेले तीस वर्षे राजीव गांधींचा मारेकरी पेरारिवलन कारागृहात शिक्षा भोगत होता. आता तीस वर्षांनंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज या प्रकरणातला शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी आत्मघातकी बॉम्बने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रविचंद्रन या सात जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *