Sunday , December 7 2025
Breaking News

सेक्स टॉय, पॉर्न सीडी, मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स…; स्वामी चैतन्यानंदचे धक्कादायक कारनामे

Spread the love

 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चैतन्यानंदने १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असून चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र, या चैतन्यानंदचे अनेक धक्कादायक कारनामे आता समोर आले आहेत. सेक्स टॉय, पॉर्न सीडी ते मोबाईलमध्ये महिलांना पाठवलेले अश्लील मेसेज अशा अनेक गोष्टी चैतन्यानंदच्या समोर आल्या आहेत.

चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर न्यायालयाने आधी पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. या दरम्यान, पोलिसांनी चैतन्यानंदची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. यामध्ये चैतन्यानंदच्या खोलीत सेक्स टॉय आढळून आला, तसेच त्याच्या फोनमध्ये अश्लील चॅट्सही आढळून आले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

सेक्स टॉय, पॉर्न सीडी, बनावट फोटो…
तपासकर्त्यांनी या प्रकरणातील चैतन्यनंद सरस्वती राहत असलेल्या खोलीतील वस्तूंची तपासणी केली तेव्हा त्यांना जे काही आढळून आलं ते पाहून धक्काच बसला. यामध्ये एक सेक्स टॉय, अश्लील सामग्री असलेले सीडी आणि तीन बनावट फोटो. पोलिसांनी सांगितलं की या बनावट फोटोमध्ये चैतन्यनंद सरस्वती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, बराक ओबामा आणि डेव्हिड कॅमेरॉन यांच्याबरोबर दिसत होता. तसेच चैतन्यानंदवर २०२५ मध्ये तीन गुन्हे दाखल असून छेडछाड, फसवणुकीसह आदी काही गुन्हे दाखल आहेत.

महिलांना नोकरीचे आश्वासन द्यायचा
स्वामी चैतन्यानंद हा गरीब पार्श्वभूमी असलेल्या महिलांना लक्ष्य करायचा आणि त्यांना नोकरीचे खोटं आश्वासन द्यायचा. पोलिसांनी असेही उघड केले की स्वामी चैतन्यनंद सरस्वती हा सहसा परिस्थितीने गरीब असलेल्या महिलांना तो टार्गेट करायचा आणि तो त्यांच्याकडे वेगवेगळी मागणी करायचा आणि त्यांना ‘बेबी, आय लव्ह यू’ अशा प्रकारचे मेसेज पाठवत असायचा.

तसेच पोलिसांनी चैतन्यनंद सरस्वतीचा फोन आणि आयपॅडची तपासणी केल्यानंतर अश्लील टेक्स्ट मेसेज आणि महिला विद्यार्थ्यांचे गुप्तपणे फोटो आढळून आले आहेत. त्याच्याकडे एअर होस्टेस आणि फोटो आणि विद्यार्थ्यांच्या डिस्प्ले पिक्चर्सचे स्क्रीनशॉट देखील सेव्ह केलेले आढळून आले आहेत. एवढंच नाही तर एका कथित चॅटमध्ये तो दुबईच्या राजासाठी सेक्स पार्टनरची व्यवस्था करण्यास सांगत असल्याचेही उघड झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *