Sunday , December 7 2025
Breaking News

50 प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; 10 ते 12 जण दगावल्याची माहिती

Spread the love

 

जैसलमेर : राजस्थानातील जैसलमेर येथे आज (14 ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. यामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती.यावेली बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 50 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.

बसच्या पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यात यश
दरम्यान, बसच्या पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आलं आहे. परंतू, मागच्या सीटवर बसलेले लोक भाजले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील 15 प्रवासी गंभीररित्या भाजले गेले आहेत आणि त्यापैकी 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. यामध्ये तीन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. खासगी बसमध्ये 57 प्रवासी होते. मंगळवारी दुपारी 3 वाजून 40 मिनीटांनी ही घटना घडली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

अडकलेल्या लोकांना वाचवता आले नाही
सहाय्यक अग्निशमन अधिकारी कृष्णपाल सिंह राठोड यांच्या मते, अग्निशमन दल पोहोचले तेव्हा बस जळालेली होती. बहुतेक प्रवाशांना स्थानिकांनी आधीच वाचवले होते. आत अडकलेल्यांपैकी कोणीही जिवंत सापडले नाही. अग्निशमन दल पोहोचले तेव्हा 10 ते 12 लोक अजूनही आत होते असे मानले जाते.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी जैसलमेर बस दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केली आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे. त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भजन लाल शर्मा अधिकाऱ्यांना सतत सूचना देत आहेत.

बस जैसलमेरहून निघाल्यानंतर काही अंतरावरच बसच्या मागील भागाला अचानक आग
जैसलमेरहून निघाल्यानंतर काही अंतरावरच बसच्या मागील भागाला अचानक आग लागली. काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वृत्तानुसार, समोर बसलेले प्रवासी कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु मागच्या बसमधील प्रवासी जळून खाक झाले आहेत. बसमध्ये लागलेल्या आगीमुळे घबराट पसरली. जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत आहे. आगीमुळे मोठे नुकसान झाल्याची भीती आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *