Sunday , July 26 2026
Breaking News

करवे कार्यकर्त्यांची न्यायालयीन आवारात धुडगूस; पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका!

Spread the love

 

बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने दोन दिवसांपूर्वी बेळगावात येऊन मराठी भाषिकांनी काळा दिन पाळला तर बेळगावची रणभूमी होईल असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. “त्या” वक्तव्याला युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांनी प्रत्युत्तर दिले होते. या वक्तव्याविरुद्ध माळमारुती पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत चौकशीसाठी शुभम शेळके यांना ताब्यात घेण्यात आले. आज दिवसभर शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकात बंदिस्त करून ठेवले होते. यावेळी पोलिसांनी शुभम शेळके यांची गाडी आणि मोबाईल फोन देखील जप्त केला. सायंकाळी शुभम शेळके यांना पंचनाम्यासाठी न्यायालयीन आवारात आणले असता महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर करवेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी दादागिरी करून धुडगूस घातला. एरवी मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी संविधानाच्या माध्यमातून आपला निषेध नोंदविला तरी देखील मराठी भाषिकांना अटक करून खोटे गुन्हे घालणारे पोलीस प्रशासन करवेच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा चालू असताना मात्र बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे बेळगावसह सीमावासीयांमधून संतापाची लाट उसळली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *