
हैदराबाद : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. चेवेल्ला मंडलमधील खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि टिप्पर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवेल्लाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर रेतीने भरलेला टिपर ट्रक समोरासमोर आदळला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकमधील माल बसवर पडला. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. अपघाताचे प्राथमिक कारण ट्रक चालक चुकीच्या दिशेने चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या चालकाची ओळख पटवली जात आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta