
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावरून राजकीय वातावरण तापले आहे. जदयूने मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे, पण भाजपने मात्र याबाबत सावध भूमिका घेतल्याने सस्पेन्स कायम आहे. भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे की, ‘एनडीएचे आमदारच मुख्यमंत्री कोण हे ठरवतील.’ या वक्तव्यामुळे बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी वाढलेली गर्दी पाहता, बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावर संभ्रम कायम आहे. जदयूने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले असले तरी भाजपने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी ‘मुख्यमंत्री कोण ठरवणार हे एनडीएचे आमदार’ असे वक्तव्य केले. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी वाढती गर्दी पाहता मुख्यमंत्रीपदाची निवड अधिकच उत्सुकतेचा विषय ठरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta