Monday , December 15 2025
Breaking News

भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली. नितीन नबीन हे सध्या बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.

नितीन नबीन आता जेपी नड्डा यांची जागा सांभाळतील. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी त्यांच्या नियुक्तीविषयी माहिती दिली. अरुण सिंह यांनी पत्रकात म्हटलं की, ‘भाजपच्या संसदीय बोर्डाने बिहार सरकारमघील मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नेमणूक तातडीने करण्यात आली आहे’.

नबीन २००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पटनामध्ये जन्म घेतलेले नितीन नबीन हे भाजपचे वरिष्ठ नेते नवीन किशोर प्रसाद यांचे पूत्र आहेत. नितीन नबीन सिन्हा हे कायस्थ समाजातून येतात. ते भाजयुमो राष्ट्रीय महासचिव देखील होते. ते बिहार सरकारमध्ये मंत्री व्यतिरिक्त छत्तीसगडचे प्रभारी आहेत.

तत्पूर्वी, आज रविवारीच भाजपने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यपदाच्या नावाचीही घोषणा केली. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपदी पंकज चौधरी यांची नियुक्ती केलगी आहे. त्यांची खासदारकीची सातवी टर्म आहे. त्यांचं कुटुंब देखील राजकारणात आहे. त्यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशाध्यक्षपदी अर्ज केला होता. त्यानंतर रविवारी त्यांची बिनविरोध निवड झाली.

About Belgaum Varta

Check Also

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन

Spread the love  मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *