
तेलंगणा : तेलंगणामध्ये समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असताना काही समाजकंटकांनी हा प्रकार केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पण या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. समाजकंटकांना अटक करण्याची आणि कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. या सर्व घटनेवर राज्यातही संताप व्यक्त होत आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.
संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या गावातील ही घटना आहे. समाजकंटकांमुळे इथं बराच काळ तणाव दिसून आली. कायदा सुव्यवस्था बिघडली. समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा आणि तो हलवण्याचा प्रयत्न केला. समाजकंटकांच्या या कृतीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. आंदोलनांतील काही जणांनी आणि पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. यावेळी समाजकंटकांचा निषेध करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta