Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसैनिक हुतात्म्यांना अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1969 साली आपले बलिदान देणाऱ्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला.

बेळगाव शहरातील खडेबाजार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंत मजुकर व इतर मान्यवरांनी दिवंगत शिवसैनिकांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंत मजुकर यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह आम्ही सीमा भागातील मराठी भाषिक जेंव्हा महाराष्ट्रात सामील होऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना चिरशांती लाभेल आणि हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती होईल असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी परशराम गोंदकर, कुशल मजुकर, विनायक कुंडेकर, अमोल मजुकर, रमेश पाटील, विनोद सुतार, मनोहर सुतार, शंकर गुरखा, मीनाक्षी पाटील, भारती राक्षे, चंदा तुपारी आदींसह बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *