Monday , June 1 2026
Breaking News

कलबुर्गीहून बेळगावला येणारे प्रायव्हेट एयरक्राफ्ट कोसळले; दोन जखमी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकातील कलबूर्गीहून बेळगावला येणारे खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावात रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या वृत्तानुसार रेड बर्डचे एक खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे.
अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
हे विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होते. इंधन संपल्याने विमान जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. इंधन संपल्याने विमानातील प्रवाशांची कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर विमानात इंधन असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. जेट अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

किमान वेतनवाढीचा दुरुस्ती आदेश रद्द करण्यासाठी उद्योजकांचा मोर्चा

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारने कामगारांच्या किमान वेतनात केलेल्या वाढीच्या दुरुस्ती आदेशाविरोधात बेळगावातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *