श्रीनगर : श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावर लडाखमधील झोजी ला या खिंडीजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून अनेक वाहने यामध्ये बर्फाखाली गाडली गेली आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर हा महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अनेक वाहने अडकले आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्या व्हिडीओत बर्फाखाली अडकलेली वाहने दिसत आहेत.
पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, शुक्रवारी दुपारी झोजी ला या परिसरात झालेल्या हिमस्खलनानंतर किमान १५ वाहने बर्फाखाली पूर्णपणे गाडली गेली आहेत. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस, लष्कर, बीआरओ, एसडीआरएफ आणि सोनमर्ग व द्रास जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta