Sunday , July 26 2026
Breaking News

आंध्रप्रदेशात भीषण बस-टिप्पर अपघात; 14 जणांचा होरपळून मृत्यू, 18 जखमी

Spread the love

 

 

अमरावती : आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील मार्कापुरमजवळ रायवरम परिसरात गुरुवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल बस आणि टिप्पर लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वेगात असलेल्या बसने गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्परला जोरदार धडक दिल्यानंतर बसला अचानक भीषण आग लागली. आग इतकी प्रचंड होती की काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बस तेलंगणातील जगतियाल येथून प्रकाशम जिल्ह्यातील पोडिली येथे जात होती. मार्कापुरमचे डीएसपी नागराजू यांनी सांगितले की, या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून काही मृतदेह अद्याप बसमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *