Tuesday , March 3 2026
Breaking News

बिग बी, शाहरुख खानसह 4 स्टार्स कोर्टात आरोपीच्या पिंजर्‍यात

Spread the love

मुंबई : गुटखा आणि पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे बॉलिवूडच्या 4 स्टार्सवर सोशल मीडियामधून खूप टीका झाली. पण आता या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात बिहार कोर्टात केस दाखल केली गेलीय. मुजफ्फरच्या सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यांनी हा खटला दाखल केला गेलाय.
पान मसालाच्या जाहिरातीवरून अक्षय कुमारवर खूप टीका, मागितलेली माफी
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार पान मसाला जाहिरात करताना दिसला होता. ते पाहून लोक भडकले होते. सोशल मीडियावर त्याला फॅन्सनीही बरंच सुनावलं होतं. वाद वाढताना पाहून अक्षय कुमारनं सगळ्यांची माफी मागितली. शिवाय तो म्हणाला होता की, या जाहिरातीतून मला जे पैसे मिळालेत, ते सगळे मी दान करतोय. अजय देवगण आणि शाहरुख खानही पान मसाल्याची जाहिरात करत आहेत. त्यावरही खूप टीका होत आहे.
अमिताभ, शाहरुख, रणवीर आणि अजयवर लावली ही कलमे
अमिताभ बच्चन तंबाखू ब्रँडचे अँबेसिडर आहेत. गेल्या वर्षी त्यांचं ब्रँडबरोबरचं काँन्ट्रॅक्ट संपलं. त्याबद्दल त्यांनी माहिती दिली होती. सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यांनी या चौघांच्या विरोधात कलम 467, 468, 439 आणि 120 बी लावले आहेत.
पैशांच्या लोभापायी जाहिरात केल्याचा आरोप
चार्टशिटमध्ये या चारही जणांवर आपल्या लोकप्रियतेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे. याची सुनावणी 27 मे रोजी होणार आहे. तमन्ना म्हणाले की यांना लाखो लोक फॉलो करतात. अनेक तरुण त्यांच्यासारखंच करू पाहतात. त्यामुळे पान मसाला किंवा तंबाखू प्रमोट करणं म्हणजे तरुणांवर चुकीचा प्रभाव पाडणं आहे. म्हणून हा खटला दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *