अमृतसर: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. आता त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार असल्याची चर्चा आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर सिद्धू वैद्यकीय तपासणीसाठी पटियाला येथील माता कौशल्या रुग्णालयात गेले.
३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना काल सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिलासा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती सिद्धू यांचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी दिली.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …