नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेप्रकरणी दोषी ठरले आहेत. याप्रकरणी २६ मे रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. याकडे हरियाणातील राजकीय वुर्तळाचे लक्ष वेधले आहे.
१९९७ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी सिरसा येथे गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी २००६ मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. २०१० मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने १०६ साक्षीदार न्यायायात सादर केले होते. या प्रकरणाच्या सुनावणीला सात वर्षांहून अधिक काळ लागला. चौटाला यांचा जबाब आरोपपत्रानंतर तब्बल सात वर्षांनी म्हणजे २०१८ रोजी दाखल केला होता.
२०१९ मध्ये ईडीने चौटाला यांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची संपती जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती ही दिल्ली, पंचकूला आणि सिरसा येथील आहे. चौटाला २०१३मध्ये जेबीटी घोटाळाप्रकरणी दोषी ठरले आहेत. याप्रकरणी त्यांना न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. मागील वर्षीच चौटाला शिक्षा पूर्ण करुन कारागृहातून बाहेर आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta