Thursday , December 26 2024
Breaking News

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू

Spread the love


टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका माथेफिरूने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एका शाळेतील १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेत मृत्‍युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये ८ वर्षीय बंदुकधारी माथेफिरूने मंगळवार (दि.२४) रोजी एका शाळेत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शाळेच्या एका शिक्षकाचाही समावेश आहे. यावेळी पोलिसांनी केल्या कारवाईमध्ये माथेफिरूचाही मृत्यू झाला आहे. या शाळेत ५०० मुले शिकत असल्‍याची माहिती मिळत असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.
अमेरिका हटविणार प्रवासावरील निर्बंध
या घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावुक होऊन म्हणाले, दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका शाळेमध्ये असाच गोळीबार करून २० विद्यार्थ्यांसहित २६ जणांची हत्या झाली होती आणि आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत आहे. यामुळे अमेरिकेत बंदूक वापरण्याबद्दल कडक कायदा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

About Belgaum Varta

Check Also

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

Spread the love  नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात खळबळ उडून देणारी एक मोठी बातमी समोर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *