पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा इशारा
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यावेळी अफगाणिस्तान आणि करोना या दोन मुद्द्यांवर त्यांनी जोर दिला. त्याचबरोबर पाकिस्तानचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं. दहशतवाद जगावरचं संकट आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये. यासाठी आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. तिथल्या परिस्थितींचा फायदा कुणी आपल्या फायद्यासाठी उचलू नये. यावेळेस अफगाणिस्तानची जनता, महिला, मुलांना आपली गरज आहे. आपल्याला आपलं कर्तव्य बजावावं लागेल., असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेतील 76 व्या सत्राला संबोधित केलं. तसेच करोना आणि भारताला स्वतंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. मागच्या वर्षी महासभेचं सत्र करोनामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौर्यावर आहेत.
दूषित पाणी ही संपूर्ण जगाची समस्या आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही 17 कोटी घरांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जगातील मोठ्या देशात अनेक लोकांना जमीन आणि घरांचे मालमत्ता अधिकार नाहीत. आज आम्ही सहा लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोनद्वारे मॅपिंग करून कोट्यवधी लोकांचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत. मालमत्ता वाद संपवण्यासाठी हा डिजिटल रेकॉर्ड उपयोगी पडेल. आज भारतात 350 कोटींपेक्षा अधिक व्यवहार होत आहेत., असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
भारत लसीकरण मोहिमेंतर्गत कोविन अॅपवरून कोट्यवधी लोकांचं लसीकरण करत आहे. सेवा परमो धर्माच्या आधारावर भारत जगाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. भारताने जगातील पहिली डीएनए लस तयार केली आहे. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते. भारताचे वैज्ञानिक एक आरएनए लस करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे भारताने पुन्हा एकदा गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे., असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जगभरातील लस उत्पादकांन भारतात येण्याचं निमंत्रण देत देशात लस करण्याचं आव्हान केलं आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …