Tuesday , March 3 2026
Breaking News

मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, पक्ष प्रवेशाआधी पटेल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मागील दोन वर्षापूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गुजरातमध्ये भाजपची आणखी ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *