Thursday , September 19 2024
Breaking News

म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च; गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम

Spread the love

नाशिक : हनुमान जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरून निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. तर पोलिसांनी गोविंदानंद सरस्वती यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात हनुमान जन्मस्थळावरून धार्मिक वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनलेले दिसत आहे. गोविंदानंद सरस्वती यांनी हनुमान जन्मस्थळाविषयी केलेला दावा त्यास कारणीभूत ठरतो आहे. हनुमान जन्मस्थळाविषयी एकमत करण्यासाठी नाशिकरोड येथे मंगळवारी धर्मसभा पार पडली होती. त्यामध्ये एकमत न झाल्याने सभा स्थगित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ होऊच शकत नाही. वाल्मीकी रामायणाप्रमाणे कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. नाशिकचे साधू-महंत जे प्रमाण सादर करीत आहेत त्यात अंजनेरीच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे अधोरेखित होत नाही. उलट किष्किंधा हेच जन्मस्थळ असल्याचे सबळ प्रमाण माझ्याकडे उपलब्ध असून, मी माझ्या भूमिकेवर अदयापही ठाम असल्याचेही गोविंदानंद सरस्वती यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *