Tuesday , September 17 2024
Breaking News

राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 15 जून ते 29 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 2 जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी देशातील सर्व राज्यांचा दौरा करू शकतात. संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात.
सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *