Wednesday , March 4 2026
Breaking News

काश्‍मीरमध्‍ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा

Spread the love

जम्मू : जम्‍मू-काश्‍मीरमधील कुपवाडा आणि कुलगाम येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्‍ये चकमक झाली. यामध्‍ये कुपवाडामध्‍ये झालेल्‍या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यात सुरक्षा दलाच्‍या जवानांना यश आले. कुपवाडा पोलिस आणि २८ आरआर दलाचे जवानांनी संयुक्‍तपणे ही कारवाई केली.

कुपवाडामधील लोलाब परिसरात दहशतवाद्यांचा आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. कुपवाडा पोलिस आणि २८ आरआर दलाच्‍या जवानांनी शोध मोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. याला जवानांनी चोख प्रत्‍युत्तर दिले. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात शोध मोहिम सायंकाळपर्यंत सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्‍यान, कुलगाममधील डीएच पोरा परिसरातही सुरक्षा दलाच्‍या जवान आणि दहशतवाद्यांमध्‍ये चकमक झाली. या परिसराला जवानांनी वेढा दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *