Saturday , December 13 2025
Breaking News

केरळमधील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब हल्ला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

Spread the love

तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब फेकून दुचाकीस्वाराने पळ काढला. सीपीआय (एम) मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, तर गुरुवारी रात्री उशिरा कार्यालयात बॉम्ब फेकल्यानंतर सीपीआय कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जमले होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

सीपीआय(एम) मुख्यालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, गुरुवारी रात्री एक व्यक्ती सीपीआय पक्षाच्या मुख्यालयासमोर आपली दुचाकी मागे वळवताना दिसत आहे, तो माणूस हातात बॉम्ब घेऊन पक्षाच्या मुख्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकतो आणि पळून जातो.

यूडीएफला भडकावण्याचा प्रयत्न

सीपीआय(एम) चे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी बॉम्ब हल्ल्यावर म्हटले आहे की, एकेजी केंद्रावर हल्ला करून कोणीतरी यूडीएफला भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

सीपीआय कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या बॉम्ब स्फोटाबाबत पोलीस आयुक्त जी. स्पर्जन कुमार म्हणाले की, पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बॉम्बने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याबरोबरच वाहनाची तपासणी सुरू केली आहे.

केरळमध्ये अशांतता पसरवण्याचा सुनियोजित कट

केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी सीपीआय(एम) मुख्यालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, केरळमध्ये अशांतता पसरवण्याचा हा सुनियोजित प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या हल्लेखोरांवर पोलिस गुन्हा दाखल करतील, अशी आशा आहे. आम्ही केरळच्या जनतेला शांतता ठेवण्याची विनंती करतो.

काँग्रेसवर आरोप

सीपीआय(एम) केरळ राज्य समितीचे सदस्य आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए. सीपीआय(एम)च्या मुख्यालयावर काँग्रेसवाल्यांनी हल्ला केला आहे, असा आरोप रहीम यांनी काँग्रेसवर केला आहे. मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि माझ्या कार्यकर्त्यांना या विरोधात शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करतो.

About Belgaum Varta

Check Also

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन

Spread the love  मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *