Sunday , September 20 2026
Breaking News

नुपूर शर्माने देशाची माफी मागावी; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!

Spread the love

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या तक्रारीवर एका व्यक्तीला अटक केली आहे, परंतु अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाने तिच्या हट्टीपणाबद्दल आणि अहंकाराबद्दल टीका केली. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे, तिच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. देशातलं तापलेलं वातावरण पाहता नुपूर शर्माने आता देशाची माफी मागावी, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *