कोलकात्ता : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात आज टीएमसी नेते स्वपन माझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या, त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हे तिहेरी हत्याकांड घडले.
काही गुंडांनी मोटारसायकल थांबवून अंदाधुंद गोळीबार करून पळ काढला. गोळी लागल्याने टीएमसी नेता आणि त्यांचे दोन साथीदार जागीच ठार झाले. सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळावरून काडतुसे आणि बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. स्वपन माळी हे टीएमसीचे नेते असून स्थानिक पंचायतीचे सदस्यही होते. कॅनिंग पश्चिम येथील टीएमसी आमदार परेश राम दास यांनी सांगितले की, मारेकर्यांनी प्रथम टीएमसी नेत्यासह तीन जणांना गोळ्या घातल्या आणि नंतर शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, तिघा जणांची हत्या झाली असून तपास सुरू आहे. स्वपन माळी, झंटू हलदर आणि भूतनाथ प्रामाणिक अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळी 9 च्या सुमारास हे तिघे स्थानिक टीएमसी कार्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. 21 जुलै रोजी दक्षिण 24 परगणामध्ये टीएमसीची रॅली होणार आहे. त्याच्या तयारीसाठीच स्वपन माळी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाच्या कार्यालयात जात होते.
खुनाची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती
केनिंगच्या गोपाळपूर पंचायतीचे ते सदस्य होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकल थांबवली होती, त्यात स्वपन माझींसह तिघेजण होते. आधी त्यांनी माझी यांना गोळ्या घातल्या आणि नंतर हलदर आणि प्रामाणिक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही गोळ्या घातल्या. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आमदार परेश राम दास म्हणाले, ’माझी मंगळवारी रात्री माझ्याकडे आले आणि म्हणाले की माझी हत्या होऊ शकते. मी त्यांना गुरुवारी दुपारी येण्यास सांगितले. जेणेकरुन, मला पोलिसांशी बोलता येईल आणि सुरक्षा व्यवस्था करता येईल.
Check Also
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर राजघाटाजवळ उद्या होणार अंत्यसंस्कार
Spread the love नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव शनिवारी …