Wednesday , March 4 2026
Breaking News

गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास; मानवी तस्करीसाठी कोर्टाने सुनावली शिक्षा

Spread the love

पटियाला: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गायकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून यामागचे कारण धक्कादायक आहे. दलेरला मानवी तस्करी प्रकरणी अटक झाली आहे. या प्रकरणात त्याची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती मिळते आहे की दलेरला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे.
पटियाला न्यायालयाने गुरुवारी गायक दलेर मेहंदीचे अपील फेटाळून लावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2003 साली घडलेल्या मानवी तस्करीच्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता तर 2 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता, न्यायालयाच्या या निर्णयाला गायकाने आवाहन केले होते. हे आवाहन आता कोर्टाने फेटाळले आहे. न्यायालयात हजर असणार्‍या मेहंदीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता की ते बेकायदेशीर स्वरुपात लोकांना परदेशात पाठवून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायचे.
दलेर आणि त्याच्या भावाविरोधात एकूण 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 2003 साली पहिला गुन्हा अमेरिकेत दाखल झाला होता. या दोघांवर असा आरोप आहे की त्यांनी अधिकतर लोकांना अमेरिकेत बेकायदेशीररित्या पाठवले होते.
दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग या दोघांवर मोठ्या प्रमाणात ’पॅसेज मनी’ आकारल्याचा आरोप आहे. या आरोपात असे म्हटले आहे की ते त्यांच्या टीममधील सदस्यांच्या वेशात लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवायचे, त्यासाठी हा पॅसेज मनी घेतला जायचा. 2018 मध्ये ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने दोन्ही भावांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. या दोघांनी त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *