
नवी दिल्ली : शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धनकड यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. 6 ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकालही येतील. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta