भीमडा : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये बारमेर परिसरात सैन्य दलाचे ‘मिग’ हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोसळून या दुर्घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आगीचे मोठे लोळ उठले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यामध्ये विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे
आणि जमिनीवर पायलटचा मृतदेहही दिसत आहेत. बैतू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमडा येथे जोरदार स्फोट होऊन विमान कोसळले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी पोलिस-प्रशासनाला याबबात माहिती दिली. विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटर परिघात पसरला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta