मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अडचणीत येताना दिसत आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक पांड्या याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. हार्दीक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता. तेथून परतत असताना मुंबई विमानतळावर कस्ट विभागाने ही कारवाई केली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, यूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती समोर आली आहे.