नवी दल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली. बुधवारी दि. 24 होणार्या कॅबिनेटच्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर होईल. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार्या संसदेच्या अधिवेशनात तिन्ही कायदे अधिकृतपद्धतीने मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.
केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकर्यांच्या हिताचे आहेत, पण शेतकर्यांना या कायद्यांचे महत्त्व आम्ही समजावू शकलो नाही. त्यामुळे आम्ही तिन्ही कायदे मागे घेत असल्याची घोषणा मोदींनी केली होती.
कॅबिनेटची मंजूरी न घेताच पंतप्रधानांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केल्याबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींवर टीका केली होती. कोणताही कायदा कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय संमत केला जातो आणि तो रद्दही केला जातो. अशी प्रथा केवळ भाजप सत्तेच्या काळातच पहायला मिळत आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली होती.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …