नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी सध्या ’भारत जोडो’ यात्रेवर असून विविध राज्यांमधून त्यांचा प्रवास सुरु आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. पण राहुल गांधी आपली ’भारत जोडो’ यात्रा अर्ध्यावर सोडून निवडणुकीसाठी दिल्लीला जाणार नाहीत. सध्या ही यात्रा केरळमध्ये असून 29 सप्टेंबर रोजी ती कर्नाटकात प्रवेश करेल. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक राहुल गांधी लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांची दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta