बंगळूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (ता. २६) राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकात येणार्या द्रौपदी मुर्मू उद्या म्हैसूर येथील चामुंडी हिल येथे ऐतिहासिक दसरा उत्सवाचे उद्घाटन करतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
हुबळी येथे हुबळी-धारवाड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या राष्ट्रपती धारवाडमधील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील.
मंगळवारी त्या बंगळुरमध्ये एचएएलच्या एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन्स उत्पादन सुविधेचे उद्घाटन करतील. त्याच प्रसंगी त्या दक्षिण विभागीय विषाणू संस्थेसाठी आभासी पायाभरणी समारंभ पार पाडतील.
राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात म्हटले आहे की, द्रौपदी मुर्मू सेंट जोसेफ व्हीव्ही समारंभ आणि कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या नागरी सन्मान सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपती २८ सप्टेंबरला नवी दिल्लीत परतणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta