Monday , December 8 2025
Breaking News

जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

Spread the love

 

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना समोर आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. सध्या हा मदतनीस फरार झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. पोलिसांनी या मदतनीसाचा शोध सुरू केला आहे.
हेमंत लोहिया हे 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शहराबाहेरील परिसरात असलेल्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. लोहिया यांच्या घरातील मदतनीस फरार आहे. त्याच्या शोधासाठी काही पथके तयार करण्यात आली आहे. तर, लोहिया यांच्या घरी फॉरेन्सिक टीमने पाहणी केली.
पोलिसांना लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेकर्‍याने लोहिया यांना गुदमरून ठार केले. त्यानंतर केचअपच्या बॉटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेमंत लोहिया यांच्या हत्येची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर आले. गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *