Tuesday , September 17 2024
Breaking News

चीनसह पाच देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

Spread the love

 

नवी दिल्ली : चीन आणि शेजारील देशांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल. जर या देशांतून आलेल्या कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास अथवा त्यांची कोविड १९ साठी चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीसाठी त्यांना हवाई सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी तीन उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. कोरोनाचा संभावित लाट रोखण्यासाठी सर्वच पातळीवर सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकी घेतली. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या बैठकीत राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित राहिले होते.

बैठकीतून विविध राज्यातील कोरोना स्थितीचा आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला. शिवाय कोरोना व्यवस्थापनाची तयारी पुर्ण करीत सर्तक राहण्याचा सल्ला मांडविया यांनी दिला होता. केंद्र तसेच राज्यांना एकत्रित काम करण्याच्या आवश्यकतेवर आरोग्यमंत्र्यांनी बैठकीतून भर दिला. कोरोना मॉनटरिंग यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना बैठकीतून देण्यात आल्या. यासोबत कोरोना तपासण्यांचे प्रमाण वाढवण्यासह रुग्णालयातील पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *