बेळगाव : बेकिनकेरे येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवस्थान येथील काल शुक्रवारी रात्री पाच लाख रुपयाची धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ व देवस्थान कमिटी तसेच देवस्थानच्या भक्तांकडून या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सहा वर्षात नागनाथ मंदिरात तिसऱ्या वेळी चोरीची घटना घडली असून यापूर्वी मंदिरातील तांब्याच्या वस्तूंची चोरी करण्यात आली होती, यानंतर दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या छतावर चढून खिडकी कापून सभागृहातील देणगी पेटी तोडून पंचवीस ते पस्तीस हजार रोख रक्कमेची चोरी झाली होती व आज रात्री अमावस्या रात्री अंधाराचा फायदा घेत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या साखळी दरवाजा व लाकडी दरवाजा असे दोन्ही प्रकारचे कुलुप तोडून चोरट्यांनी मुख्य गाभाऱ्याचा कुलुप तोडण्यात आले व गाभाऱ्यात प्रवेश केला व नागनाथ मुर्तीवरील असलेल्या सहा किलो वजनाचे चांदिचे मुकुट घेऊन चोरट्यांनी लंपास केला आहे व मंदिरातील किंमती ऐवजसह चोरीची घटना घडली आहे. सकाळी दररोजच्या पुजेसाठी मंदिरचे पुजारी कलाप्पा गावडे गेले असता सदरची घटना समोर आली. मंदिराचा दरवाजा अर्धवट उघडे होते. यांनी शेताकडे जाणारे व दररोज सकाळी दर्शनला जाणारे खाचु सावंत यांनी ग्रामस्थांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. नागनाथ मंदिर हे पांडव कालीन प्राचीन मंदिर होते. पाच वर्षांपूर्वी त्यां मंदिरचे नुतनीकरण करून पाच वर्षांपासून दि. ३ डिसेबर रोजी सालाबाद प्रमाणे मंदिरचे हजारोंच्या संख्येने वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला तेंव्हा चोरट्यांचे लक्ष वेधले कि काय? असा तर्क-वितर्क ग्रामस्थांत होत आहे. मागील आठवड्यात बसुर्ते ब्रम्हलिंग देवस्थानची घटना ताजी असतानाच पुन्हा दुसरी मोठी चोरी करण्यात आली आहे. यामुळे चोरट्यांनी आता मंदिरे केंद्रीत केली असून चोरी करणाऱ्या टोळ्या परप्रांतीय आहेत की या भागातील आहेत याचा उलगडा करणे गरजेचे आहे असे पश्चिम भागातील लोकांनातून चर्चा सुरू आहे. यानंतर सदर घटनेची माहिती काकती पोलिस निरीक्षक यांना कळविण्यात आली. त्यांनी मंदिराच्या आवारात काकती पोलिस्थानचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांच्यासह त्यांचे सहकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल होऊन पुढिल तपास सुरू केला आहे.