Monday , September 21 2026
Breaking News

जागतिक सायकल दिनानिमित्त ‘संडे ऑन सायकल – स्वच्छता राईड’चे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : जागतिक सायकल दिन आणि फिट इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल – स्वच्छता राईड’ या विशेष सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सायकल फेरीची सुरुवात सकाळी ७.३० वाजता चन्नम्मा सर्कल येथून होणार असून, जिल्हा क्रीडांगणापर्यंत सायकल रॅली काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत देशभर विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या भव्य सायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायकल फेरीबरोबरच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि आरोग्य व तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध फिटनेस उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. युवक, विद्यार्थी, क्रीडापटू, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यदायी आणि स्वच्छ भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“फिटनेससाठी सायकल, स्वच्छतेसाठी सहभाग” हा संदेश देणारा हा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *