अहमदाबाद : एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) आसाराम बापूला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज न्यायालयाने याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे आसाराम बापुला यापूर्वीदेखील एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून त्याला २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी ठरवण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta