Saturday , November 7 2026
Breaking News

‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रिमंडळात हा निर्णय मांडण्यात आला होता. एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालेय.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15 निर्णय घेण्यात आले. यामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने राज्यांना सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ याचे गीतकार राजा बढे आहेत. तर गायक शाहीर साबळे असून संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

Spread the love    लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *