Tuesday , March 3 2026
Breaking News

मान्सून लांबला; हवामान विभागाने दिली माहिती

Spread the love

 

नवी दिल्ली : राज्यात मान्सून दाखल होण्याआधी अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, IMD ने मान्सूनबाबत पुन्हा शक्यता वर्तवली आहे. मान्सून काल (रविवारी) केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, त्याची सुरुवात झाली नाही. भारतीय हवामान विभागाकडुन आता मान्सून आणखी तीन ते चार दिवस उशीरा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.

पंरतु अजुनही केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लांबला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला असुन केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *