भोपाळ : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळून आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये भोपाळहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या एका व्यक्तीला ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या चपाती जेवणात झुरळ दिसले आणि त्या प्रवाशाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून IRTC विरोधात संताप व्यक्त केला.
पुंडूक नावाच्या ट्विटर अकाऊंटवर झुरळासोबत चपाती जेवणाचा फोटो व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर IRTC ने माफी मागितली. आम्ही ही बाब गांभीर्याने घेऊ. अन्न तयार करताना सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.
भोपाळ विभागाच्या रेल्वे व्यवस्थापकाने भोपाळहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी भोजनाची व्यवस्था केली. योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta