Monday , December 8 2025
Breaking News

समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 16 मजुरांचा मृत्यू

Spread the love

 

शहापूर : काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.

जखमींना रुग्णालयात
सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत. आतापर्यंत १७ पैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

मृतांचा संख्या वाढण्याची भीती

बुलढाण्यात मागील महिन्यात समृद्धी महामार्ग मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला होता. बस पेलटल्यानंतर झालेल्या अपघातात २६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत. त्याचवेळी १ ऑगस्ट रोजी दुसरा मोठा अपघात या महामार्गावर झाला आहे. शहापूरजवळ सरळआंबाजवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना हा अपघात झाला. त्या ठिकाणी २२ कर्मचारी काम करत होते. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजून पाच ते सहा जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *