Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर चव्हाण यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद काही दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीने नवीन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ऍड. सुधीर चव्हाण यांची निवड केली.

जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. सुधीर चव्हाण यांची निवड झाली आहे.

सोमवारी सायंकाळी बेळगाव वकील संघटनेच्या झालेल्या बैठकीत कंग्राळी बी के गावचे सुपुत्र सुधीर चव्हाण यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

कै. किसनराव येळ्ळूरकर यांच्यानंतर ऍड. सुधीर चव्हाण यांच्या निवडीने बेळगाव बार असोसिएशनला जवळपास 30हून अधिक वर्षांनी मराठी माणसाला अध्यक्ष पद मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे. सदर निवडीमुळे वकील सुधीर चव्हाण यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *