Saturday , September 21 2024
Breaking News

भारताचे चंद्रावर आज पहिले पाऊल!

Spread the love

 

श्रीहरिकोटा : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.

भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. या क्षणाला चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून लँडिंगची तयारी सुरू झाली आहे.

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोनं दिलीय..

चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण
भारत अवघ्या काही तासांमध्ये इतिहास रचणार आहे. भारत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. घरबसल्यास आपल्या सर्वांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता येणार आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. लँडिंग ऑपरेशन्सचं लाईव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAChttps://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html कडून 23 ऑगस्ट रोजी 17:20 वाजता सुरू होणार आहे.

चांद्रयान 3 साठी शेवटचे पंधरा मिनिटं कसोटीचे?
2019 मध्ये चांद्रयान-2 यशाच्या जवळ होतं लॅण्डर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर 2.1 किमी उंची गाठली होती. किरकोळ तांत्रिक बिघाड झाला आणि लॅण्डर क्रॅश झालं. त्यामुळे चांद्रयान-3साठी ते शेवटचे 15 मिनिटं महत्त्वाची मानली जातात. भारतीय वेळेनुसार 23 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लॅण्डर चंद्रावर लॅण्ड होईल पण त्या आधीचे १५ मिनिटं निर्णायक असतील कारण लॅण्डिंगची प्रक्रिया त्या शेवटच्या पंधरा मिनिटातच होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची निवड

Spread the love  नवी दिल्ली : आप आमदार आतिशी मार्लेना यांची दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *