Wednesday , March 4 2026
Breaking News

मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरचा संशयास्पद मृत्यू; घरातच आढळला मृतदेह

Spread the love

 

चेन्नई : मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपर्णा नायर राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. 31 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अपर्णा नायरची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपर्णा नायरने निधनाच्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली होती. तिने तिच्या लाडक्या लेकीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला होत. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं होतं,”मेरी उन्नी, प्लेफुल लिटिल वन”. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे आणि कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडली अपर्णा
अपर्णाच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. तिच्या निधनाने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अपर्णा गुरुवारी रात्री तिरुवनंतपुरम येथील तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर लगेचच अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषिक केलं. करमना पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करत आहेत.

अपर्णाच्या पश्चात पती आणि दोन मुली आहेत. अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे तिची हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आता याप्रकरणाची चौकशी करत आहेत. अपर्णाच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अपर्णाच्या निधनाने इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ माजली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *