Tuesday , December 9 2025
Breaking News

तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट; 11 जणांचा मृत्यू

Spread the love

 

विरुधुनगर : तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील रंगापालयम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मंगळवार या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यात स्फोट
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस, अग्निशमन आणि बचाव कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी मिळून आग विझवण्याचा आणि पीडितांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पीटीआयशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, “शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळावरून सापडलेल्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.”

स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची माहिती
पहिली दुर्घटना रंगपालयम येथे घडली. रंगपालयमच्या फटाका कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचार्‍यांनी स्थानिकांसह आग विझवली. येथून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले अशसून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. दुर्घटनेत मृत्यू झालेले लोक येथे काम करणारे मजूर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात आणखी तीन जण जखमी झाले होते, नंतर उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

दुसरी दुर्घटना किचनायकनपट्टी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात घडली. या दुर्घटनेच एकाचा मृत्यू झाला, तर दोन महिला मजूर बचावल्या. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *